Saturday, October 23, 2021
Home Marathi प्रभावी पालकत्वाची आवश्यकता का आहे ?

प्रभावी पालकत्वाची आवश्यकता का आहे ?

378 Views

आज हे जग तुमच्या पाल्यांना, तुमच्या मुलांना दोन प्रकारच्या गोष्टी देण्यासाठी तयार आहे एक म्हणजे जीवघेणी स्पर्धा आणि सार्‍या अपेक्षांचे ओझे, जे काही तुमच्याकडून तुमचे नातेवाईकांकडुन तुमच्या मित्रांकडून, शाळेकडून आहेत आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची मुले काही अशा वेगवेगळ्या गोष्टींच्या संपर्कामध्ये येत आहेत ज्यामुळे त्यांना काही वेळा संभ्रम काहीवेळा भावनात्मक वर्तवणूक किंवा वाईट सवयींना बळी पडण्यासाठी भाग पाडणार्‍या गोष्टी त्यांच्या समोर येत आहेत आणि अशा वेळेस आपली मुले सतत आपल्याकडून सक्षमीकरण आणि प्रभावी सल्ल्याची मागणी करत असतात. आशा वेळी आपण आपल्या सर्व जबाबदारी शाळेवर किंवा शिक्षकांवर सोपवु शकत नाही कारण त्यांना त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी त्यांच्यावर आधीच भार असतो.

तुम्हीच तुमच्या मुलांच्या जीवनात एक महत्त्वपूर्ण व्यक्ती आहात आणि म्हणूनच मुलं इतर कोणाही पेक्षा तुमचं जास्त ऐकतात.

म्हणजेच आई आणि वडील हे मुलांसाठी त्यांच्या जीवनामध्ये सिग्निफिकंट म्हणजेच महत्त्वपूर्ण व्यक्ती समजत असतात. आणि म्हणूनच तुमची मुले तुम्हाला रोल मॉडेल म्हणून आपली ओळख आणि आपल्या जीवनाचे ध्येय विश्वास ह्या सगळ्यांना ते फोलो करत असतात आणि आपल्याला हे देखील समजून घेणे आवश्यक आहे की, जर आपल्या मुलांमध्ये काही वाईट सवयी, काही वाईट गोष्टींमध्ये असणार्‍या इंटरेस्ट तसेच वाईट कृती जर त्याच्यामध्ये विकसित होत असतील तर तो त्या वेळेस त्याच्या आव्हानांच्या मध्यभागी असतो आणि म्हणूनच तो ह्या गोष्टी सोडू शकत नाही.

आणि म्हणूनच हे आपलं काम आहे की आपणच एक निरीक्षक म्हणून या सगळ्या गोष्टींकडे पाहिलं पाहिजे आणि त्यांच्या मध्ये बदल घडवून आणला पाहिजे.

काही पालकांना असे वाटते की ते बहुतेक बरोबर आहेत आणि समस्या फक्त मुलांमध्येच आहे पण खरं म्हटलं तर तसं नसतं, मुले एका स्पंज सारखे असतात जे त्यांच्या मनामध्ये येणारी प्रत्येक गोष्ट चोखुन / गिळून टाकतात, मग तो आत्मविश्वास असो वा भीती लवचिकता किंवा निराशा आनंद किंवा नैराश्य ठामपणा असो किंवा राग असो आणि अशा वेळेस त्याला प्रशिक्षण देणं हे पालकांचे कर्तव्य आहे जेणेकरून ह्या सगळ्यांमध्ये योग्य गोष्ट निवडली जाईल.

पालक बनणे ही काही लोकांसाठी एक घटना आहे. त्यांना मानवी मानसशास्त्र चे कोणतेही प्रशिक्षण क्वचितच मिळते करण आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये मानसशास्त्राचे कुठलेही शिक्षण किंवा आदर्श पालकत्व कसे असावे या प्रकाराचं कुठलंही शिक्षण दिले जात नाही प्रत्येक पालकाला असं वाटतं की मुलाला चांगल्या शाळेमध्ये पाठवलं तर त्यांच्या समस्या सुटतील पण आज असं होताना अजिबात दिसत नाही आणि आज बहुतेक पालकांना आपल्या मुलांसह किशोर वयातील मुलांशी संवाद साधण्याचे आवाहन वाटते. जेव्हा मुले आणि पालक एकमेकांवर बोट दाखवतात तेव्हा अशी परिस्थिती उद्भवते.

आज आपल्या विकसनशील समाजामध्ये नैराश्य, चिंता, ताण, तणाव आणि नातेसंबंध इत्यादी अनेक विषयांचा आपल्याला सामना करावा लागत आहे. आणि आता हे केवळ पालकांसाठी कर्तव्यच नाही तर त्यांच्या मुलांसाठी प्रभावी पालकत्वाची जबाबदारी देखील बनली आहे.

“आदर्श पालकत्व एन एल पी तंत्राद्वारे.” या मालिकेत दिलेली तंत्रे आणि एक्ससाइज आपल्याला आणि आपल्या मुलांना एक अद्भुत व्यक्तिमत्व विकसित करण्यास नक्कीच मदत करतील आम्ही सांगितलेली एन एल पी तंत्रे जर तुम्ही योग्य प्रकारे अवलंबली आणि त्याचा योग्य प्रकारे उपयोग करून घेतला तर मी नक्कीच खात्रीशीर तुम्हाला सांगू शकतो की तुम्ही तुमच्या मुलांमध्ये एक आदर्श व्यक्तिमत्व निर्माण कराल.

या मालिकेमध्ये येणारे सर्व लेख तुम्हाला नेहमीच फायदेशीर ठरतील. हे लेख तुम्ही सुद्धा वाचा तुमच्या नातेवाईकांना तुमच्या मित्रांना आणि तुमच्या ओळखीच्या सर्वांना नक्कीच पाठवा.

धन्यवाद

RELATED ARTICLES

आदर्श पालकत्व एन एल पी काही पूर्वग्रह/ पूर्वस्थिती भाग १

एन एल पी हे तंत्र अनेक पूर्वस्थितीवर आधारित आहे यालाच आपण इंग्रजीमध्ये Presuppositions असे म्हणतो. ही पूर्वग्रह म्हणजेच काही गोष्टींचं सामान्यीकरण किंवा आपण लावलेला...

Take Care Of Your Child’s State

A state is sum total of hundreds of processes that keep going on in the mind and body at any moment. People call it...

Before you communicate : Set rapport with your child.

Before you say anything, you need to be in rapport with your child. The rapport between two people is an environment of friendliness. Once...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

आदर्श पालकत्व एन एल पी काही पूर्वग्रह/ पूर्वस्थिती भाग १

एन एल पी हे तंत्र अनेक पूर्वस्थितीवर आधारित आहे यालाच आपण इंग्रजीमध्ये Presuppositions असे म्हणतो. ही पूर्वग्रह म्हणजेच काही गोष्टींचं सामान्यीकरण किंवा आपण लावलेला...

प्रभावी पालकत्वाची आवश्यकता का आहे ?

आज हे जग तुमच्या पाल्यांना, तुमच्या मुलांना दोन प्रकारच्या गोष्टी देण्यासाठी तयार आहे एक म्हणजे जीवघेणी स्पर्धा आणि सार्‍या अपेक्षांचे ओझे, जे काही तुमच्याकडून...

Take Care Of Your Child’s State

A state is sum total of hundreds of processes that keep going on in the mind and body at any moment. People call it...

Before you communicate : Set rapport with your child.

Before you say anything, you need to be in rapport with your child. The rapport between two people is an environment of friendliness. Once...

Recent Comments